व्हीएसआरएस मराठी न्युज –इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘रीव्हर सायक्लोथॉन 2022’ रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.27 नोव्हेंबर) सकाळी पावणे सहा वाजता, भोसरी गावजत्रा मैदान येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही रॅली तीन टप्प्यांमध्ये पाच किलोमीटर गाव जत्रा मैदान- लांडगे पेट्रोल पंप- इंद्रायणीनगर परत गाव जत्रा मैदान, 15 किलोमीटर गाव जत्रा मैदान- जय गणेश साम्राज्य चौक- क्रांती चौक- स्पाईन सिटी चौक- गवळीमाथा- परत गाव जत्रा मैदान, 25 किलोमीटर गाव जत्रा मैदान जय गणेश साम्राज्य चौक- साने चौक- कृष्णा नगर चौक- स्पाईन सिटी चौक- गवळीमाथा परत गाव जत्रा मैदान या मार्गाने रॅली जाणार आहे.
त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.
भोसरी/ तळवडे/ निगडी वाहतूक विभाग
1) पुणे- नाशिक हायवेवरील बाबर पेट्रोल पंप ते जय गणेश साम्राज्य चौक दरम्यान जाणारी लेन बंद करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग: नाशिक- पुणे हायवे वरील जय गणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ) ते बाबर पेट्रोल पंप दरम्यानच्या लेन मधून दुहेरी वाहतूक सोडण्यात येणार आहे.
2) कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून भोसरी स्मशान भुमी कडे जाणारा मार्गावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग: चांदणी चौक, पीएमटी चौक येथून टप्प्याटप्प्याने वाहतूक करण्यात येणार आहे.
मागील पाच वर्षांपासून रिव्हर थॉन रॅली आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी पर्यावरण रक्षणासाठी ‘रिसायकल – रिड्युस – रियूज’ हा विषय घेऊन ‘सायक्लोथॉन’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या रॅलीसाठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post