व्हीएसआरएस मराठी न्युज –
सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42 बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील 2, नवी मुंबई महानगर पालिका परिवहनाचे 1, सोलापूर महानगर पालिका परिवहन महामंडळाचे 1, पुणे महानगर पालिका परिवहन महामंडळ मर्यादितचे 1, बेस्ट चे 1 वाहन चालकांचा समावेश आहे.
येथील कंस्टीट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी सायंकाळी ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्यावतीने ‘हिरोज ऑन द रोड’या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून बस चालकांच्या कुटूंबीयांसोबत ‘सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये 17 बस चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता 30 वर्षे सेवा दिलेली आहे.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना चालकांसाठी जाहीर केल्या आहेत. यामध्ये भरतीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे. निवडलेल्या चालकांना भरतीच्या वेळीच अद्यावत प्रशिक्षण देणे. वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे.
Discussion about this post