व्हीएसआरएस मराठी न्युज -खासदार सौ.सुप्रियात सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पुणे महानगरपालिका आयुक्त,उपायुक्त व अधिकाऱ्यांसमवेत शहरातील खड्डे,रस्ते घनकचरा या समस्यांबाबत बैठक पार पडली.
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,’ पुणे शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या रस्त्यांची दरवर्षी जर कामे करावी लागत असतील तर कामांच्या दर्जाबाबत निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भाजपने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यावेळी खा. सुळे यांनीकेली’.
या बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका खड्डे व रस्ते खोदाई बाबत करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन ही देखील मोठी समस्या असून या समस्येवर उपाय योजना म्हणून पुणे महानगर पालिकेने इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर काही उपाययोजना असून त्या बाबतचे सादरीकरण देखील महानगरपालिका आयुक्त यांनी सादर केले.
Discussion about this post