व्हीएसआरएस मराठी न्युज –महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे.
मुंबई येथे १ मे २०२३ रोजी होणा-या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसाठी टिळक भवन, दादर येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ, राजू वाघमारे यांच्यासह ठाणे शहर व ग्रामीण, भिवंडी शहर, कल्याण शहर, उल्हासनगर शहर, वसई विरार शहर, मिरा भाईंदर शहर, नवी मुंबई शहर, पनवेल, रायगड, पालघर व मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post