व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहरात घोषित व अघोषित अशा 71 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्यांमध्ये रहिवाशी नागरिकांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना सेवा शुल्क भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने या रहिवाशांना 1 लाख रूपयांचा अपघाती आरोग्य विमा देण्याचे विचाराधीन आहे.
पिंपरी चिंचवड शहरात घोषित व अघोषित अशा 71 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्यांमध्ये रहिवाशी नागरिकांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांना सेवा शुल्क भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने या रहिवाशांना 1 लाख रूपयांचा अपघाती आरोग्य विमा देण्याचे विचाराधीन आहे. सेवा शुल्काच्या स्वरुपात झोपडपट्टीधारकांकडे 14 कोटी 68 लाखांची थकबाकी आहे.
विमा योजना लागू केल्यास कदाचित सेवा शुल्क भरण्यास नागरिक पुढे येथील असा आशावाद महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाला वाटत आहे. सेवा शुल्क भरणाऱ्या प्रत्येक झोपडीधारकांसाठी ही विमा योजना असणार आहे. त्यासाठी 18 ते 70 अशी वयोमर्यादा आहे. तीन महिन्यांच्या आत सेवाशुल्क तसेच संपूर्ण थकबाकी भरल्यास विम्याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत अपघातामध्ये निधन झाल्यास वारसाला 1 लाख आर्थिक मदत मिळणार आहे. महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने झोपडपट्टीतील रहिवाशांना 1 लाख रूपयांचा अपघाती आरोग्य विमा देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
Discussion about this post