व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांना विश्व मैत्री संघाच्यावतीने दिला जाणारा राष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि.27) पिंपरी-चिंचवडमध्ये रामकृष्ण मोरे नाट्यमंदीरात होणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विश्व मैत्री संघाच्यावतीने पुरस्कार वितरत करण्यात येतो. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, संगीत, प्रशासनात उत्तम काम करणाऱ्यांना गौरविण्यात येते. कुस्तीपटू विजय चौधरी हे तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते आहेत. सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकाविल्यानंतर शासनाने त्यांची पोलीस खात्यामध्ये निवड केली. प्रशिक्षणानतंर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आहे. त्यापाश्र्वभूमीवर चौधरी यांना राष्ट्र गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Discussion about this post