व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात येत .
शहराच्या विविध भागातील 48 पत्राशेड असे 29 हजार 780 चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले.कारवाईचा धडका पाहून नागरिक स्वत:हून अनधिकृत पत्राशेड काढून घेतले जात आहेत.”ग” क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.27 कोकणे कॉर्नर ते नढे कॉर्नर नाल्या लगत अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
या कारवाई मध्ये 4 पत्राशेड अंदाजे 2465 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाढण्यात आले. तसेच 8 पत्राशेड 6565 चौरस फुट अनधिकृत बांधकाम स्वत: नागरिकांनी काढून घेतले. ”क” क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत गट नंबर 100 आक्शा इलिजिंन्स सोसायटी समोर 18 मीटर डीपी रोड, गट नं.13, देहु आळंदी रोड चिखली बस स्टॉप आरक्षण व पोलीस स्टेशन आरक्षणावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या कारवाई मध्ये 25 पत्राशेड असे 2950 चौरस फुट अनधिकृत बांधकामे पाडण्यात आले.
Discussion about this post