व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संचालित चिखलीतील ‘जगद््गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’त 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
यातील अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात ‘सीबीएसई’च्या नियमानुसार आहे, अशी माहिती संतपीठाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत महापालिकेने चिखलीत ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ स्थापन केले आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम- 2012 अंतर्गत शाळेचे कामकाज सुरू आहे. संतपीठामध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे.येथील अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन आणि अध्यापन प्रणाली ‘सीबीएसई’ नुसार इंग्रजी माध्यमातून असेल.
त्यामध्ये मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांचा समावेश असेल. प्रवेशप्रक्रियेसाठी प्रथम चौकशी अर्जांचे वाटप करण्यात येईल. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 20 मार्च आहे. पात्र अर्जामधून जागांच्या उपलब्धतेनुसार सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
Discussion about this post