व्हीएसआरएस मराठी न्युज -मराठा
आरक्षणासाठी गेल्या तीन महिन्यापासून जीवाचं रान करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांना ॲडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यांच्या तातडीने वैद्यकीय चाचण्याही करण्यात येत आहेत. मात्र, जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांची आवश्यक ती तपासणी करण्यात येत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. आज त्यांनी मराठवाड्यात सभांचा धडाका लावला होता. आज त्यांची बीडमध्ये सभा पार पडली. बीड जिल्ह्यातील अंबासाखर कारखाना(वाघाळा) येथे मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वीच्या एका सभेला संबोधित करत असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते स्टेजवरतीच बसले होते. त्यांना थकवा वाटत होता. अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी अर्ध्यातच भाषण थांबवलं. थोडावेळ जागेवर बसले होते. डॉक्टरांनी येऊन जरांगे पाटील यांची प्रकृती तपासली. त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्लाही दिला. पण जरांगे पाटील यांनी हा सल्ला ऐकला नाही.
Discussion about this post