व्हीएसआरएस मराठी न्युज -यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव किमी 56/900 व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी 74/900 येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू,
असून 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
Discussion about this post