व्हीएसआरएस मराठी न्युज –(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.९ सोमवार रोजी आळंदी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरील, फूटपाथ वरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नगरपरिषदे जवळच असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरच्या जागेत,फूटपाथ शेजारी
टपऱ्या,बांबू रोवलेली काही दुकाने होती त्या विरोधात कारवाई करत तेथील पूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. नदी पलीकडील श्री गुलाबराव सर्वोदय महाराज ट्रस्ट येथे फुटपाथ वर असलेले
बांबू व पत्र्याच्या सहाय्याने तयार केलेल्या मोठे हॉटेल होते त्यावर ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे फुटपाथ वरील मोठा अडथळा दूर झाला आहे. जोग महाराज व घुंडरे गल्ली यांच्या कॉर्नर ला रस्त्यावर असणारी टपरी काढण्यात आली.आज जेसेपी सहाय्याने काही अतिक्रमणे काढली गेली व टॅक्टर मध्ये अतिक्रमण केलेल्या काही वस्तू भरण्यात आल्या.
तसेच काही ठिकाणी फूटपाथवर व रस्त्यावर काही अतिक्रमणांना राजकीय राजाश्रय लाभले आहेत,अशी नागरिकांमध्ये चर्चा असते त्या अतिक्रमणा विरोधात कारवाई होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post