व्हीएसआरएस मराठी न्युज –उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत दीड तासाहून अधिक चर्चा झाली.
अजित पवार यांच्याबरोबर खा.प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थितीत होते. या भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांच्याशी दिल्लीत भेट झाली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सवाचा आनंद शेअर करण्याच्या संधीबद्दल कृतज्ञ असे म्हटले. मात्र या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
Discussion about this post