व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला शहराध्यक्ष यांच्या बदलाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी देत शहराध्यक्षपदी माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान युवा नगरसेवक अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश गोरे यांची भगिनी कविताताई अल्लाट व युवक अध्यक्षपदासाठी पानसरे गटाचे इम्रान युनुस शेख यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन युवकांची ‘युवा टीम’ महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील आढावा बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. याबाबत दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन घवाने सर्व नावांची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे.
शहराध्यक्ष यांच्या जोडीला तीन कार्याध्यक्ष ….
शहरात शहराध्यक्ष, शहराध्यक्ष व युवक शहराध्यक्ष यांच्या सोबतीला तिन्ही विधानसभेसाठी स्वतंत्र कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
१) भोसरी राहुल भोसले, पिंपरी विधानसभेसाठी जगदीश शेट्टी व चिंचवड विधानसभेसाठी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.
२) महिला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी सविता भारत धुमाळ, उज्वला सुनील ढोरे, ज्योती विनोद गोफणे यांच्याकडे स्वतंत्र जबाबदारी दिली आहे.
३) शहर युवक कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रसन्न बाळासाहेब डांगे, निलेश नाथा निकाळजे आणि योगेश पंडित गवळी यांच्याकडेही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्याने अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर लावण्यासाठी राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक युवक नेतृत्व यांनी पक्षाला भरघोस यश मिळवून दिल्याचा आदर्श समोर ठेवून बदल केले असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकारणीमध्ये तिन्ही शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष युवा कार्यकर्त्यांना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस 2022 ची सार्वत्रिक निवडणुकीला युवा जोश तयार करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केले आहे.
Discussion about this post