व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: व्हीएसआरएस न्यूज ने आळंदी शहरातील पथ दिव्यांच्या बाबतीत दिलेल्या बातमी नंतर काही गल्ली बोळातील व काही भागातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच जुना पूला पुढे असणारे पथदिवे ते देहूफाट्या पर्यंत चे पथदिव्यांची दुरुस्ती होऊन चालू
असतानाचे दिसत आहे. रात्री जुना पूल ते देहूफाटा पथदिव्यांचा प्रकाश नसल्याने त्या रस्त्यावर व तेथील परिसरात अंधार होत होता.अंधारात गैरप्रकार घडू नये व पथदिवे चालू करण्याची येथील नागरिकांची मागणी होती.मरकळ रस्त्यावरील एका बाजूचे फुटपाथ वरील पथदिवे
बंद असतानाचे दिसून येत आहेत.
काही बंद अवस्थेत असणारे पथदिवे ते ही माऊलींचे प्रस्थान होणाच्या अगोदर तेथील पथदिव्यांची दुरुस्ती होईल.अशी आशा नागरिकांनी येथे व्यक्त केली आहे.
तसेच काही विविध भागात ड्रीनेज लाईन तुंबत असल्याने
नागरिक ही त्रस्त होते.त्या संबंधित व्हिएसआरएस न्यूज च्या बातमी नंतर तत्काळ नगरपरिषदेने गटार लाईन साफ सफाई चे काम हाती घेतले.आणि आळंदी शहरात
नगरपालिकेचे त्या संबंधित असणारे कर्मचारी यांनी आळंदी शहरातील विविध भागात गटार लाइन्स चे चेंबर्स उघडे करत गटारीतील घाण गाळ बाहेर काढताना दिसत होते व जिथे चेंबर तुंबलेले आहेत तिथे तुंबलेले गटार लाईन योग्य अश्या रितीने साफ सफाई करून घाण बाहेर काढून मोकळे करताना दिसत होते.आळंदी नगरपरिषदे कडून होणाऱ्या पथदिवे दुरुस्ती व ड्रीनेज लाईन साफ सफाई या कामां बद्दल काही भागातील नागरिकांनी समाधान
व्यक्त करत व्हिएसआरएस न्यूज चे धन्यवाद मानले आहेत.
Discussion about this post