व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-गेली दोन वर्षे कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने आषाढी पायी वारी सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता.यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्याने आषाढी पायी वारी सोहळ्या साठी आलेल्या वारकरी भाविकांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्या साठी व पायी पालखी सोहळा करीता वारकरी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
आज संख्येत मोठ्या खांद्यावर भगवी पताका,महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळस,वीणा, टाळ ,मृदुंग वाजवत,माऊली च्या नाम घोषात वारकरी आळंदी मध्ये दाखल होत आहेत.राज्याच्या विविध भागातून दिंड्या आळंदीत येत असतात.रस्त्यावर मोठ्या संख्येत वारकरी भाविकांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. लहान मोठी वाहने घेऊन काही दिंडीतील वारकरी दाखल होत आहे. इंद्रायणी घाटावरती स्नानासाठी आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी वाढलेली दिसून आली.यंदा पायी वारीत ३० –४०% भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता संस्थान ने वर्तवली असल्याने मोठ्या संख्येत काही भाविक उद्या २१जून पर्यंत प्रस्थान सोहळ्या साठी आळंदीत दाखल होतील.
वारकरी भाविकांनी आपल्या सोई सुविधे साठी धर्मशाळेचा आश्रय घेतलेला दिसून येत आहे तर काहींनी मोकळ्या जागेत राहुट्या उभ्या केलेल्या दिसून येत आहेत.
आळंदीत इंद्रायणी घाटावरती व गावात विविध ठिकाणी वासुदेव, भगवे वस्त्र धारण केलेले महाराज साधू वर्ग हरी नाम,नाथांच्या नाम घोष करत फिरत आहेत.एका दिंडीने हरिनामाच्या घोषात, अश्वा सहित येऊन सिद्धबेटा ला भेट दिली. विविध धर्मशाळेत व भाविक वारकरी जिथे वास्तव्यास थांबले आहे तिथे दिवस रात्र हरी नामाचा गजर चालू आहे.भाविकांसाठी नदी पलिकडे ऊन ,वारा ,पाऊस लागू नये यासाठी संस्थान तर्फे लाकडी बांबू,वासे ,पत्रा इ. वापर करत मोठ्या दर्शनबारीचे काम पूर्ण होत असताना दिसत आहे.भक्ती सोपन पूला वरील दर्शन रांग भाविकांनी भरून गेली आहे.
माऊलींच्या मंदिरात ही दर्शनासाठी मोठया संख्येत भाविकांची गर्दी झालेली दिसून येत आहे.ठिक ठिकाणी नागरिकांकडून वारकऱ्यांना अन्नदान होत असल्याचे पाहायला भेटत आहे.
उद्या २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा असल्याने उद्या संध्याकाळ पर्यंत अजून गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post