व्हीएसआरएस मराठी न्युज -जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटने टोल नाक्यावर बेकायदेशीर टोल वसुली सुरू होती.
त्या विरोधात तळेगाव दाभाडे येथील सर्व पक्षीय कृती समितीने ‘टोल हटाव’चे शस्त्र उगारलं आहे.
त्या निषेधार्थ आज जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चासाठी सर्व सामान्य तळेगावकर नागरिकांसह सर्व पक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.
मोर्चाची दखल घेऊन येत्या १० मे पर्यंत सोमाटणे टोलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कमलाकर फड यांनी यासंदर्भात येत्या सोमवारी (ता.१८) पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक बोलावली आहे.आठवडाभरात राज्यसरकारच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बैठक घेऊ.न्याय मिळाला नाही तर तुमचा लोकप्रतिनिधी आंदोलकांच्या बाजूने असेल असे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.
Discussion about this post