व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –वर्तमानपत्र आणि इतर मुद्रण क्षेत्राशी संबंधित ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांच्या यजमानपदाखाली येत्या १७ ते १९ नोव्हेंबर रोजी नेस्को – मुंबई प्रदर्शन केंद्र येथे ‘एशिया कोट इंक’ या प्रदर्शन आणि व्यापार मेळ्याच्या आयोजित करण्यात आला आहे.
ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, (एआयपीआयएमए) ही १९५३ मध्ये स्थापन झालेली संघटना, सध्या श्री. राघवन श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे आणि तिच्या कार्यकारी समितीवर भारतातील सर्व आघाडीच्या शाई कंपन्यांकडून प्रतिनिधित्व केले जाते.
यावेळी AIPIMA चे उपाध्यक्ष डॉ. राघव राव म्हणाले की, “सुमारे ३०० शाई उत्पादक संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत ज्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली (एनसीआर), तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात आहे. शाई उद्योगाद्वारे झालेली रोजगार निर्मिती ही ‘एआयपीआयएमए’च्या अंदाजानुसार, सुमारे १००,००० लोकां थेट आणि उत्पादन शृंखलेतील भागीदारांसह आणखी सुमारे १२०,००० लोकांना यातून नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत.
मुद्रण शाई क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी मार्गदर्शक व बोधप्रद ठरेल अशा सादरीकरणासह, जपान, जर्मनी, ब्रिटन, अमेरिकेमधून तज्ज्ञ, अनुभवी वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
असोसिएशनच्या सदस्यांनी भारत आणि जगभरातील शाई उद्योगातील सर्व सहभागींना या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी आमंत्रित केले आहे . १७, १८, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी नेस्को, मुंबई येथे आशिया कोट प्रदर्शनाला जरूर भेट द्या, असे आवाहन आयोजकांनी केले.
Discussion about this post