व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आता आरटीओकडून 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. या वेळी वाहनचालक नियमभंग करताना आढळल्यास आरटीओकडून मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महामार्गावरील वाढते अपघात रोखण्याकरिता नवनियुक्त परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी हे आदेश दिले आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. नुकतीच भोसरी येथील सीआयआरटी येथे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकार्यांची परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
येत्या 1 डिसेंबरपासून ही मोहीम आरटीओ प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
Discussion about this post