व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी(प्रतिनिधी) राजस्थान रणजी क्रिकेट टीम चे माजी कर्णधार कैलाश गट्टानी यांच्या सन्मानार्थ लायन्स क्लब ऑफ तळवडे प्राइडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५० वर्षावरील पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धेत बाश्री ब्लास्टर्स संघाने कैलाश गट्टानी करंडक पटकावला.
मोशी येथे आयोजित प्रतिभा ग्रूप ऑफ़ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ दीपक शहा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
बाश्री ब्लास्टर्स आणि लवास रॉयल यांच्यात अंतिम लढत झाली.लवास रॉयल संघ उपविजेता ठरला. तर ओम व्हीसीसीए नागपूर आणि बीकेसी लायन यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
यावेळी राजस्थान माजी रणजीपटू कैलास गट्टाणी, लायन्स क्लब तळवडे प्राईडचे अध्यक्ष कैलाश पारीख, वसंत कोकणे,क्रिकेट स्पर्धा समन्वयक विजय अगरवाल,क्रीडा संचालक शिरीष भोपे, सुधीर , वसंत गुजर, डॉ अशोक अगरवाल, श्रीधर वाके, रतन खारोल आदी उपस्थित होते.
यावेळी अमानी नांदल, सुहासिनी कांदल, ईश्वरी अवसरे,भाविका अहिरे, संतोष चव्हाण, सारस जोगी या उदयोन्मुख खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भूषण देशपांडे मालिकावीर, प्रशांत तुपे सामनावीर, गणेश कुदळे उत्कृष्ट फलंदाज , मनोहर पाटील उत्कृष्ट गोलंदाज , भालचंद्र कुलकर्णी फायटर ऑफ मॅच अशी पारितोषिके देण्यात आले.
Discussion about this post