व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई –भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परम पूजनीय, बोधिसत्व , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध राज्यस्तरीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये, बार्टीमार्फत प्रशिक्षण प्राप्त केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षामधील यशवंत अधिकार्यांचा प्रतिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यातील काहींनी मनोगत व्यक्त केले. मार्जिन मनी योजनेचा लाभ प्राप्त झालेल्यापैकी निवडक नवउद्योजक महिलांना धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो.
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार माननीय शरद पवार साहेब या वेळी प्रमुख पाहुणे होते. उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार, गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री माननीय जयंत पाटील, खासदार अरविंद सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, राज्याचे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हेही या वेळी उपस्थित होते.
Discussion about this post