व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –14 एप्रिल)पिंपरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी, जेवणाची,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आहे, यासाठी पाणपोईचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे,
14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11,30 कष्टकरी कामगार पंचायत कार्यालय भक्ती कॉम्प्लेक्स समोर आयोजित या उपक्रमाचे उदघाटन
पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री . ” कृष्ण प्रकाश, साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, व आशा कांबळे उपस्थित होते.
आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की,
तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक आहात,तुम्ही बुद्धी प्रमान्यवादी बना,तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवा,म्हणजे तुम्हाला कोणी दिशाभूल किंवा दिशाभ्रमित करणार नाही.ही पार्टी ती पार्टी असा भ्रम निर्माण होणार नाही,बाबासाहेबांचे विवेकवादी विचार तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील.मी तुम्हा सर्वांना शुभेच्या देतो.
या वेळी कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, टपरी पथारी हातगाडी पंचायत, घरकाम महिला सभा, कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र वाहतूक पंचायत, हमाल माथाडी कामगार पंचायत, बांधकाम बांधकाम मजूर पंचायत इ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post