व्हीएसआरएस मराठी न्युज -देहू:-श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराजांचे स्मरणीय शिळा मंदिर साकारण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकपर्ण सोहळा येत्या १४ जून रोजी होणार आहे.
या अभूतपूर्व व ऐतिहासिक सभारंभाच्या सभामंडपाचे भूमिपूजन शांतिब्रम्ह ह.भ. प.मारुती बाबा कु-हेकर, गोविंद गिरी महाराज ,देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि लेफ्टनंट कर्नल भुपेंद्र सागी यांच्या
हस्ते झाले.
लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या उपस्थित राहणार आहेत. जवळपास ३०- ४० हजार जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितलं आहे.
Discussion about this post