व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, अतिरिक्त आयुक्त उन्हास जगताप, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
निगडी चौक येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उन्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशहर अभियंता संजय बावडे, विजयकुमार काळे, क्षेत्रीय अधिकारी मिताराम बहुरे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड जनसंपर्क विभागाचे प्रफुल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे, उद्यान महाय्यक नंदकुमार उवळसकर, मनसे गटनेत सचिन चिखले, पिंपरी चिंचवड राजपूत संघटनेचे पदाधिकारी शिवकुमार वायस, प्रवीण राजपूत, श्रीराम परदेशी जगताप, ललित पवार, जितेंद्र पाटील अशोक अप्पा, किरण परदेशी, सदिप कवडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post