व्हीएसआरएस मराठी न्युज प्राधिकरण-पिंपरी । पुणे जिल्ह्यात बिहार दिन साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील खान्देश मराठा मंडळ या ठिकाणी हा सोहळा पार पडला. हा कार्यक्रम वर्षातून एकदा साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी बिहार फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
कोरोनाच्या काळात बिहार सरकारकडून मिळालेली मदत महाराष्ट्र आणि पुण्यात असलेल्या बिहारमधील लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याचे काम बिहार फाऊंडेशनने केले आहे.
त्यामुळे बिहार फाऊंडेशनच्या लोकांना बिहार सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व कोरोना योद्ध्यांना बिहार सरकारकडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त श्री एस के सिंग, संचालक संरक्षण संपदा श्री संजीव कुमार आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश तसेच विश्व श्री राम सामाजिक सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड, पुणे व परिसरात राहणाऱ्या बिहारमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली.
Discussion about this post