व्हीएसआरएस मराठी न्युज प्रतिनिधी –आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ओबीसी मोर्चा शहरात राबवणार ओबीसी जोडो अभियान –
6 एप्रिल भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व ओबीसी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या माध्यमातून ओबीसी जोडो अभियानास प्रारंभ होणार.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व ओबीसी युवक मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) येत्या 06 एप्रिल पासून भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या स्वरूपात ओबीसी जोडो अभियानास प्रारंभ करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे माध्यमातून संपूर्ण ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे काम पूर्ण होणार आहे. ओबीसी जोडो अभियानाच्या निमित्ताने आयोजित नियोजन बैठकीसाठी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज ब्राह्मणकर, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर,, कैलास भाऊ सानप, योगेश आकुलवार,नेहूल कुदळे,शंकर लोंढे, प्रवीण बनकर, प्रवीण गोरे, शशिकांत पुंड ,नितीन साळी, ओंकार हिंदळेकर, जयश्रीताई देशमाने, सविताताई करपे, लता हिंदळेकर, श्रुतिका पुंड,रोहिणी साळुंखे ,मनिषा ढोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर यांनी ओबीसी जोडो अभियानांतर्गत प्रभागातील नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच या अभियानांतर्गत विविध प्रभागातील डॉक्टर, इंजिनियर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक अशा व्यक्तींचा सत्कार करून त्यांना ओबीसीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम होणार आहे.
तसेच प्रत्येक प्रभागांमध्ये ओबीसी जोडो संपर्क अभियानाचे पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. यानिमित्ताने उपस्थित विविध पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये आपली मते मांडून ओबीसी जोडो अभियान अधिक प्रभावीपने कसे राबवता येईल याबद्दल आपापली मते मांडली आली.
Discussion about this post