व्हीएसआरएस मराठी न्युज तळेगाव- निसर्ग अभ्यासिकेत “फ्रेंड्स ऑफ नेचर” या संस्थेचा 24 वा वर्धापन दिन ऊत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे श्री धनंजय शेडबाळे यानि निसर्गाचा र्हास थांबवायचा असेल तर संघर्ष करावाच लागेल असे प्रतिपादन केले. त.दा. पोलीस स्टेशन चे PSI महेश मतकर यानी यापुढेही निसर्ग संवर्धना सारख्या चांगल्या कामात पोलिस सदैव संस्थेला साथ देत रहातील याची ग्वाही दिलि. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सुपर्णा गायकवाड यानी नवनिर्वाचित अध्यक्ष नीरज शाही यांचेकडे सुत्रे सूपूर्त केली.
नवीन कार्यकारिणीत श्री निशिकांत पंचवाघ यानि सचिव पदाची तर श्री सुधाकर मोरे यानि मावळते खजिनदार अमीत पोतदार यांचेकडून खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली. कीरण मोकाशी यानि जनसंपर्क अधिकारि पदाची तर दिपक शिरसाठ यानि सह सचिव पदाचा पदभार स्विकारला .
या कार्यक्रमात ऊपस्थिताना 213 पक्षांच्या घरट्यांचे व 400 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. प्लॅस्टिक पिशव्यां न वापरण्याचे अवाहन करण्यात आले . या पुढेही कोणास पक्षांची घरटि हवी असल्यास मोफत पुरवलि जातील असे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यानी सांगितले.
पुजा डोळस यानि सूत्रसंचालन केले तर
सचीव श्री निशिकांत पंचवाघ यानि उपस्थितांचे आभार मानले.
डाॅक्टर श्री गणेश सोरटे, विवेक रामायणे, अतुल भालेकर, विश्वास देशपांडे, डाॅ व्हटकर मॅडम यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे काम केले .
Discussion about this post