व्हीएसआरएस मराठी न्युज -मंत्रीचंद्रकांत पाटलांना शाईफेकीची धमकी. धमकीच्या पार्श्वभूमीवर सांगवीत पोलिसांचा मोठा फौजफाटा. पिंपरी-चिंचवडमध्ये जत्रेचं चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन झाला.
मागील शनिवारी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. पवनाथडी जत्रेवेळी त्यांनी त्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले, कोणाला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. त्यांना घाबरून मी फेसशिल्ड लावली नाही तर माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी मी फेसशिल्ड लावली आहे.
मागील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. त्यावेळी तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस दलातही मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा शाई फेक करणार असल्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता. त्या पार्शवभूमीवर सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच पवना थडी जत्रेतही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Discussion about this post