व्हीएसआरएस मराठी न्युज –उत्तर भारतीय बांधवांच्या चार दिवसीय छठ पूजा उत्सवास आज (शुक्रवार) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था व इतर आवश्यक बाबी पुरविण्यात आल्या आहेत.
श्री सूर्यषष्ठी महाव्रत 2023 या अंतर्गत सुर्यषष्ठी महाव्रतास आरंभ होणार असून शुक्रवारी (दि. 17) रोजी स्नान ध्यान, शनिवारी (दि. 18) रोजी रसियाव रोटी (छोट की छठ), रविवारी (दि. 19) सूर्य षष्ठी व्रत, संध्या अर्घ आणि सोमवारी (दि. 20) रोजी पारण, प्रातः अर्ध असे चार दिवस विधीपूर्वक मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोशी इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती, पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ लालबाबु गुप्ता यांनी केले आहे.
Discussion about this post