व्हीएसआरएस मराठी न्युज -आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा आता अंतिम टप्पा आलाय. या विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास सर्वात नेत्रदीपक ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आतापर्यंत कोणीही पराभूत करु शकलेलं नाही. भारतीय संघानं 9 पैकी 9 साखळी सामने जिंकून 18 गुणांसह पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्कं केलंय. भारतीय संघाची ही चौथी अंतिम फेरी आहे. भारतीय संघानं दोनदा फायनल जिंकली आहे. यापुर्वी भारतीय संघानं 1983, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. त्यात 1983 आणि 2011 साली भारत विश्वविजेता ठरलाय.
या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा प्रवास चढ-उतारांचा राहिलाय. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघानं 9 पैकी 7 साखळी सामने जिंकले. 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियानं 14 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करुन त्यांना अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाची ही आठवी अंतिम फेरी आहे. यापैकी त्यांनी विक्रमी म्हणजे पाचवेळा अंतिम सामना जिंकलाय. कांगारुंनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकलाय.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी
टीम इंडिया रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.
Discussion about this post