व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व अभियंते यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी मा. मुख्यमंत्र्यांकडे केली होती या तक्रारीची दखल चोवीस तासांत घेत रमेश वाघेरे यांना मेल द्वारे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सह:शहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी, सहशहर देवाण्णा गट्टुवार, कार्यकारी अभियंता उद्यान स्थापत्य सुनील वाघुंडे , कार्यकारी अभियंता संजय घुबे, कार्यकारी राजेंद्र राणे तेसच निवृत्त झालेले शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के अनिल रॉय यांच्याही बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे वाघेरे म्हणाले होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वरील उल्लेख केलेले अभियंते व अधिकारी यांचे मोठ मोठ्या उद्योगपती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते यांना ही लाजवेल असे बंगले आहेत. काहींच्या बंगल्यांना लिफ्ट आहेत. तर काही अभियंत्यांच्या नावे मावळात तसेच मूळ गावी स्वतःच्या तसेच इतर नातेवाईकांच्या व जवळच्या मित्रांच्या नावावर कित्येक एकर जमीन आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या ही बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी.
यातील काही अधिकाऱ्यांनी दरवर्षी आपल्या उत्पन्नाचे व मालमत्तेचे विवरणपत्र महापालिकेला सादर करणे आवश्यक असताना दिलेले नाही. त्यांनी आपली संपत्ती महापालिकेपासून लपवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.
Discussion about this post