व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मिडीयम स्कुल, लिटल फ्लॉवर विद्यालय व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने गांधी जयंती साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने वाकड येथील वेदांता सोसायटीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी इंदोरच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका करत असलेल्या उपाययोजना, नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन करून, आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आव्हान केले. स्वच्छतेचे महत्त्व सांगत कचरा वर्गीकरणाबद्दल माहिती दिली. यावेळी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व, कचरा वर्गीकरण व परिसर स्वच्छतेबाबत नागरिकांत प्रबोधन करण्यात आले.
वेदांता सोसायटीचे चेअरमन डॉ. सोमनाथ धोंडे यांनी सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपायुक्त जांभळे यांनी अशा उपक्रमांसाठी महापालिका योग्य ते सहकार्य करणार असल्याचे वचन दिले. यावेळी महापालिकेचे ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, आरोग्य अधिकारी महेश आढाव, अतुल सोनावणे, भीमराव कांबळे, रश्मी तुंडलवार व वेदांता सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
Discussion about this post