व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी (दि.०३) सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये, तसेच विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासक शेखर सिंह यांनी केली आहे.
Discussion about this post