व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानाचा शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने शुक्रवारी खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर अध्यक्ष रमेश बागवे याच्या नेतृत्वाखाली ‘माफी मांगो आंदोलन’ केले.
यावेळी रोहित टिळक, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, नीता रजपूत, पूजा आनंद, विशाल मलके, मुख्तार शेख, बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते.
करोना काळात केंद्राने मदत केली नाही परंतु कॉंग्रेसने आणि राज्यसरकारने लाखो लोकांना मदत केली. अडचणीच्या काळात मदत करणे ही कॉंग्रेसची परंपरा आहे. त्याला जर ‘करोना पसरवला’ असे पंतप्रधान म्हणत असतील तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे मोदींनी माफी मागावी असे जोशी म्हणाले.
Discussion about this post