व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -महाराष्ट्राचे नवे डीजीपी रजनीश सेठ असतील. त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय पांडे यांच्याकडून ते राज्याच्या डीजीपी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार होता. राज्याला पूर्णवेळ डीजीपी नाही, अशी टीका विरोधक सातत्याने करत असत. पूर्णवेळ डीजीपी नसल्याबद्दलही न्यायालयाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता सरकारने संजय पांडे यांच्याकडून डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार काढून रजनीश सेठ यांची राज्याच्या डीजीपीपदी नियुक्ती केली आहे. रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्रचे प्रमुख आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. संजय पांडे एप्रिल 2021 पासून राज्याच्या डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती
Discussion about this post