व्हीएसआरएस मराठी न्युज –खा. राहुल गांधी यांचे खास विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले हर्षवर्धन सपकाळ यांची ८ दिवसाआधी प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड झाली हाेती.. आज त्यांनी साेशल मिडीयाच्या माध्यमातुन आपले नाव प्रदेश प्रतिनिधी च्या यादीतुन आपले नाव वगळून आपल्याऐवजी काँग्रेसच्या इतर कुठल्याही कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासंदर्भात ते फोनवरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याशीसुध्दा बाेलले आहे. सपकाळ यांच्या या निर्णायाचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडुन स्वागत हाेत आहे.
राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदाची सुत्रे पुन्हा एकदा हातात घ्यावी अशी मागणी काँग्रेसमधून जाेर धरत असतानासुद्धा राहुल गांधी यांनी अध्यक्ष हाेण्यास स्पष्ट नकार दिला असुन भारत जाेडाे ययात्रेवरच त्यांचा सर्व फाेकस आहे.. आपल्या या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच हर्षवर्धन सपकाळ यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बाेलले जात आहे.
Discussion about this post