व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -अशोक भालकर महाव्यवस्थापक हे महाराष्ट्र शासन कर्मचारी असून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतगत स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक ह्या ठिकाणी चार वर्ष कार्यकाल संपुष्टात आला असून त्याची महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती केली असून सुद्धा तीन महिने झाले.
तरी सुद्धा अशोक भालकर महाव्यवस्थापक स्मार्ट सिटी हे दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती होत नाही किंवा स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणचा कार्यभार सोडत नसून दुसऱ्या पात्र अधिकारी ह्यांच्या वरती अन्याय असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी गंभीर दखल घेऊन ,अशोक भालकर महाव्यवस्थापक ह्यांना कार्यकाल संपुष्टात आला.
म्हणून समज किंवा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी तसेच लवकरात लवकर स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक येथील कारभार काढून दुसऱ्या कार्यक्षम अधिकारी ह्यांच्या कडे सोपविण्यात यावा ज्या अधिकारी ह्यांनी महाराष्ट्र सरकारने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक अशोक भालकर ह्याची कार्यकाल मुदत संपुष्टात आली त्यांना जाणूनबुजून सहकार्य केले त्याच्या विरोधात खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते यांनी केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागतिर्गत अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या संवर्गात कार्यरत श्री अशोक भालकर यांना, संदर्भाधीन दिनांक २०.६. १९८६ च्या अधिसुचनेन्चये विहित केलेल्या प्रदेश नियमानुसार, मुख्य अभियंता (स्थापत्य) या पदावर (सुधारित वेतन मैट्रीक्स एस-२९ वेतन संरचना पी.बी. ४ चेतन बैंड रूपये ३७४००-६७००० ग्रेड वेतन ८९००/ नियमानुसार, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त पदावर पदोक्ती देण्यात येत असून पदोत्रतीउपरांत मुख्य अभियंता (स्थापत्य) संवर्गातील त्याची पदस्थापना त्यांच्या नावासमोर करण्यात आली.
Discussion about this post