व्हीएसआरएस मराठी न्युज -काँग्रेसच्या वाट्याला येणा-या दोन जागांसाठी मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर.
काँग्रेसक़डून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
भाजपाने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Discussion about this post