व्हीएसआरएस मराठी न्युज –माेताळा: दि १० जुन २२ (शुक्रवार) – माेताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे उद्या संध्याकाळी ५:३० वाजता काँग्रेसचा संविधान चेतना मेळावा पार पडणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील काही महत्वाच्या लाेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश सुध्दा हाेणार आहेत.
या कार्यक्रमासाठी नामदार विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडाेरे यांची प्रमुख उपस्थिती असनार आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धनदादा सपकाळ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बाेद्रे, काँग्रेसचे जेष्ट नेते मुखत्यारसिग राजपुत यांच्यासह तालुक्यातील सर्व काँग्रेसची मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आआवाहन माेताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post