व्हीएसआरएस मराठी न्युज –
जेजुरी:-जेजुरीत सोमवती आमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे .कोरोना काळा मध्ये २ वर्षे यात्रा बंद होती.
दोन वर्षातून यात्रा भरल्याने भाविकां मध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.राज्यभरातून लाखो भाविकांनी यात्रेनिमित्त गर्दी केली आहे. भाविक भांडाऱ्याची उधळण करत करत गडावर पोहचत आहेत. सदानंदाचा व यळकोट यळकोट जय मल्हार जयघोष आणि भंडरा खोबऱ्यांची मुक्त उधळण त्याने संपूर्ण गड परिसर जेजुरीतील रस्ते पिवळे धमक भांडाऱ्याने रंगले आहेत.त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रूप आलं आहे. भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी
व्यवस्थितरित्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सकाळी ११ वाजता गडावरून पालखीही कऱ्हा स्नानासाठी निघली आहे. सायंकाळी ४ वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात आली.भाविकांनी पवित्र कऱ्हा नदीत स्नानाचा लाभ घेतला.
गाभाऱ्यात व मंदिरावर आकर्षक फुलसजावट करण्यात आली आहे. तसेच नयनरम्य विद्युत रोषणाई ही गडावर करण्यात आली आहे.
Discussion about this post