व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मनोज जरे युवा मंच व नीलिमा मनोज जरे नारी शक्ती मंच यांच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अडीचशेहून अधिक सामाजिक व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
चिखली संकुलातील म्हेत्रे गार्डन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, महिला राणरागिणी, राष्ट्रसेवा, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबू गुप्ता यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लालबाबू गुप्ता हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक कार्यासह उद्योग क्षेत्रात कार्यरत असून या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मनोज जरे युवा मंच व निमिला जरे नारी शक्तीमंच यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला माजी उपमहापौर तुषार हिंगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, पंकज भालेकर, यश साने आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post