व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-
निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालय पार्किंगमध्ये सेतू केंद्र नागरी सुविधा केंद्राची ऑगस्ट 2023 मध्ये मुदत संपली आहे. मात्र बेकादेशीर सेतू केंद्र सुरू असून, त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
याबाबतीत अप्पर तहसीलदार बघ्याची भूमिका घेत असून, या सेतू केंद्राकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. त्या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
Discussion about this post