व्हीएसआरएस मराठी न्युज -भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे ह्यांना परीवर्तन हेल्पलाईन नंबर वर ३० लाख रुपये रक्कम खंडणी मागणी करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हयापुवी सुद्धा आमदार महेश लांडगे ह्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्या वेळी भोसरी पोलिसांनी काही गुंडांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आमदार पोलिस सुरक्षा तैनात असताना सुद्धा अपघात झाले आहे .विनायक मेटे, जयकुमार गोरे ,योगेश कदम यांच्या वाहनाचा अपघात झाला असून आमदार महेश लांडगे ह्यांना ३० लाख रुपये खंडणी रक्कम मागणी करण्यात आली आहे .
घातपात होण्याची दाट शक्यता असून आमदार महेश लांडगे ह्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे.
Discussion about this post