व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा पवार पहिल्यांदाच शहरात आले आहेत. शहरात आज सकाळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर महापालिकेत त्यांनी प्रशासकीय आढावा बैठक सुरू केली आहे. शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प तसेच नवीन कामांचा ते आढावा घेतले आहेत.
त्यानंतर चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तेथे अजितदादा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजितदादा पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अल्पावधीत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले. ”वेस्ट टू एनर्जी” सारख्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतूक केले.
अजित पवार यांनी सुमारे अडीच तास शहरातील विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा केली. यामध्ये वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, प्रधानमंत्री आवास योजना, प्रस्तावित पिंपरी-चिंचवड क्लब, ललित कला भवन अशा विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली. विशेष म्हणजे, ”आयुक्त शेखर सिंह आणि मी सातारामध्ये जिल्हाधिकारी असताना एकत्रितपणे काम केले आहे. अल्पावधित सिंह यांनी शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आंद्रा-भामा आसखेडमधील पाणी मिळण्याबाबत प्रशासनाने चांगले काम केले..” अशा शब्दांत आयुक्त आणि प्रशासनाची पाठ थोपाटली. तसेच, अजित पवार यांचा एकत्रित मूड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे संदर्भ दिला.
यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post