व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह , राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो.
भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो.
या दिवशी त्या शहिदांचे स्मरण केले जाते ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना विशेष आदरांजली वाहिली जाते.
शहीद दिनानिमित्त हौतात्म्य पत्कारलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली
*स्वातंत्र्य सेनानी शहीद वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांच्या बलिदान दिनानिमित्त आज कुदळवाडी येथे नगरसेवक दिनेश भाऊ यादव जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी बलिदान दिवस साजरा करण्यात आला*
*यावेळी प्रकाश चौधरी, स्वराज पिंजन, स्वप्निल डावखरे, दीपक घन, श्याम थोरात, शरद गोरे , मोईद शेख… सर्व कार्यकर्ते उपस्थित होते*
Discussion about this post