व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
उद्या दिनांक ६-४ -२०२२ भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहरात ओबीसी जागर अभियानाची सुरवात करणार असून मोदी सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी घेतलेले निर्णय,, ओबीसी समाजासाठी भाजपने दिलेले योगदान व ठाकरे सरकारची ओबीसी समाजाविषयी ची असलेली निष्क्रियता अशा विषयांची सुमारे १०००० पत्रके संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात वाटली जाणार आहे.
भाजपा ओबीसींचा
ओबीसी भाजपाचा
असा नारा देत भाजप ओबीसी मोर्चाची ओबीसी जागर अभीयानाला उद्यापासून सुरवात होत आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रासकर यांनी दिली.
Discussion about this post