व्हीएसआरएस मराठी न्युज पिपरी-चिंचवड -संत रविदास बहुुउद्देशिय संस्था पिंपरी-चिंचवड शहर तर्फे गुढीपाडव्यानिमित्त 2 एप्रिल रोजी मातृ सेवाभावी संस्था, चिंचवड येथील निराधारांना ब्लँकेट, गहू, तांदूळ तसेच सकाळचा नाष्टा देण्यात आला. यावेळी सदर कार्यक्रमास मातृ सेवा संस्थेचे अध्यक्ष सुहास गोडसे आणि संस्थेचे पदाधिकारी तसेच कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काशिनाथ नकाते, सुरेखा सुर्वे, मधुकर बुरुडे, रोहित बुरुडे, प्रिया बुरुडे आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षिय भाषणात संत रविदास बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सातपुते म्हणाले की, समाजातील निराधार, वृद्ध असहाय्य आहेत. ते आपल्या माता-पित्यांसारखे आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या जन्मदात्या आई-बापांना घरातच ठेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. कारण आईवडिलांमुळेच आपण आज उभे आहोत. तसेच समाजातील दानशूर लोकांनी अशा वृद्धाश्रम अनाथाश्रमांना योग्य प्रकारे मदत करून सेवा केली पाहिजे.
सदर कार्यक्रमाचा समारोप मधूकर बोरुडे यांनी केला.
Discussion about this post