व्हीएसआरएस मराठी न्युज –भीषण अपघातातील गंभीर जखमीं साठी देवदूत ठरलेल्या डॉ वसंत भांदुर्गे आणि सौ गीता भांदुर्गे आम्हाला आपला अभिमान आहे
2 ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्गावर एका व्हॅगनार कार चे नियंत्रण सुटल्यामुळे डिव्हायडरवर आढळून भीषण अपघात झाला त्यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला त्याचवेळी मागून येणाऱ्या वसंत भांदुर्गे व सौ गीता भांदुर्गे यांनी तात्काळ थांबून सदर कार मधील गंभीर जखमींना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले व तात्काळ ॲम्बुलन्स आणि पोलिसांना फोन केला सदर गंभीर प्रवाशांना तात्काळ मदत मिळाल्यामुळे सर्व पाचही प्रवाशांचे जीव वाचले समाजसेवेचे व्रत घेतलेल्या जागृत नागरिक महासंघाचे डॉक्टर भांदुर्गे हे विश्वस्त सभासद आहेत जागृत नागरिक महासंघ डॉक्टर भांदुर्गे आणि सौ गीता बांदुर्गे आपला आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो .
असेच समाजसेवेचे कार्य आपण पुढे चालू ठेवूया खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्याला सलाम
नितीन यादव अध्यक्ष जागृत नागरिक महासंघ
Discussion about this post