व्हीएसआरएस मराठी न्युज –संपूर्ण क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेला गुरुवार (5 ऑक्टोबर) पासून सुरूवात होतीय. गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात या वर्ल्ड कपची पहिली मॅच होणार आहे.
भारतामध्ये 2011 नंतर पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप होतोय. हा वर्ल्ड कप पुणेकरांसाठी देखील महत्त्वाचा आहे. कारण, पुण्यात (पिंपरीचिंचवड) यंदा एक किंवा दोन नाही तर तब्बल 5 मॅच होणार आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात वर्ल्डकपच्या मॅच होत आहेत.
पुण्यातील सामन्यांचं वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – 30 ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 1 नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स – 8 नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश – 11 नोव्हेंबर
Discussion about this post