व्हीएसआरएस मराठी न्युज -आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-आळंदी व आळंदी परिसरात पंचक्रोशीतील गावातील शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत.
उन्हाळी पीक काढून शेतकऱ्यांनी शेतात नांगरट करून घेतली आहे.
म्हणजेच पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल अशी जमिनीची कायिक स्थिति तयार करण्यासाठी पिक पेरण्यापूर्वी जी जी कामे केली जातात त्यास पूर्वमशागत, असं म्हटल जात.
चांगली नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन मुळ जमिनीत खोलवर पसरतात आणि भरघोस उत्पादन मिळत. नांगरटीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी ती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे.
योग्य वेळी नांगरट केल्यामुळे जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून उन्हानं चांगली तापते.
किडीचे अवशेष म्हणजे अंडी-अळी-कोष नांगरटीमुळे वर येतात.उघडे पडतात आणि प्रखर उन्हामुळे त्यांचा नायनाट होतो.
पूर्वीच्या पिकाची धसकटे, बुडखे निघतात.
शिवाय पिकांचा पालापाचोळा, निघालेली बुडखे, धसकटे जमिनीत गाडली जाऊन तिथं कुजतात.
थराची उलथापालथ होती.
जमीन भुसभुशीत होते.
हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
हरळी-कुंदा यांसारखी आणि इतर सोटमुळाचे बहुवर्षीय तन उलथून उघडे पडते आणि उन्हाने मरून जातात. नांगरट केल्यामुळे जमीन भुसभुशित होते.
नांगरट जर उताराला आडवी केली तर उन्हाळी, वादळी पावसच पाणी अडवलं जातं आणि जमिनीत मुरवलं जातं. नांगरटीमुळे निचरा न होणार्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटाशियम याचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
त्यामुळे जमिनीचा पोत आणि रासायनिक तसेच प्राणिज गुणधर्म सुधारतात. त्यामुळेच भरघोस उत्पादन मिळते.
बागायती पिकं घेताना सुरवातीला त्यांना करावी लागणारी रानबांधणी आणि दिलं जाणार पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरट जरुर आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या पावसाळा सुरू होण्या अगोदरच्या शेतीच्या पूर्वमशागती झाल्या असून आता
पुरेसा पाऊस पडल्या नंतरच्या मशागती राहिलेल्या दिसून येत आहेत.पाऊस झाल्यानंतर च फणनी,पाळी घालणे किंवा टॅक्टर द्वारे रोटरणी ईतर कामे करणे ही कामे पुरेश्या पाऊस न पडल्याने रखडली आहेत. ही मशागती ची कामे केल्या नंतरच पेरणी च्या कामाला सुरुवात होते.
खेड तालुक्यात बरेच ठिकाणी सद्यस्थितीत पुरेसा पाऊस न झाल्याने पाऊस झाल्यानंतर च्या मशागती ची कामे रखडलेली दिसून येत आहेत.त्यामुळे येथील बळीराजा सध्या शेतीच्या मशागतीसाठी
पावसाची वाट पाहत बसला आहे.
Discussion about this post