व्हीएसआरएस मराठी न्युज -फिर्यादी अमोल राजाभाऊ चौधरी वय ३८ वर्षे धंदा मॅनेजर रा. सर्व्हे नं. १४१५ भावेश्वर हौसींग सोसयटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे यांनी फिर्याद दिली की, दिनांक २४/०९/२०२२ दिनांक २५/०९/२०२२ रोजी बँकेला सुट्टी असल्याने आज दिनांक २६/०९/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वा. चे सुमारास एच. पी. पेट्रोल पंप, आकुर्डी, पुणे येथील पंपावर जमा झालेली सुमारे १२ लाख रुपये रोख रक्कम ते स्वतः च कैलास देशमुख असे एका बँगमध्ये घेऊन महाराष्ट्र बैंक, आफूड, निगडी, पुणे येथे जमा करण्यासाठी जात असताना बँकेचे पाय-यांवर २ अज्ञात आरोपींनी गावठी पिस्टल दाखवुन त्याचे हातातील पैशाची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी व कैलास देशमुख यांनी आरडाओरडा केल्ल्याने तुळजाभवानी मंदिर येथे बंदोबस्त करीता असलेल्या म.पो.शि. सरस्वती काळे यानी कर्तव्यतत्परता दाखवत लोकांचे मदतीने सदर आरोपींना अटकाव केला असता एका इसमांस ताब्यात घेतले व एक इसम पळुन गेला. मपोशि सरस्वती काळे यांनी तात्काळ निगडी पोलीस ठाणेस सदरची माहिती पोलीस ठाणेस कळविल्याने निगडी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, उत्तम ओमासे, परि.पो.उप.नि. नाथा केकाण व तपास पथकाचे अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेतले असुन त्याचेकडे विचारपुस करता त्याचे नांव प्रमोद नामदेव चांदणे वय २२ वर्षे रा. मोरेवस्ती, हरीओम सोसायटी, चिखली, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे एक गावठी पिस्टल व चार जियत काडतूसे मिळून आली असून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचे मित्र १) ताईतराव सुदाम कांबळे य २४ वर्षे रा. अजिंक्यतारा सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली, पुणे २) जयदिप मधुकर चव्हाण वय ११ वर्षे रा. ताराबाई चाळ, शिवपार्वती हॉसींग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे असे सर्वांनी मिळून आकुर्डी, पुणे येथील पेट्रोल पंपावरील जमा झालेली रक्कम लुटण्याचा कट केला असल्याचे सांगीतले. आरोपीपैकी ताईतराय सुदाम कांबळे हा यापूर्वी संदर पेट्रोल पंपावर कामास असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून गुन्द्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय शेळके हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त सो, मा.डॉ.संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त सो, मा. श्री. मंचक इप्पर पोलीस उपआयुक्त साो. परि १. मा. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.डॉ.सागर कवडे सहायक पोलीस आयुक्त साो पिंपरी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रंगनाथ उडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत खुळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजयकुमार धुमाळ, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम ओमासे, पोलीस उपनिरीक्षक, परि.पो.उप.नि. श्री. नाथा केकाण निगडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस हवालदार सुधाकर अवताडे, सतिश ढोले, दत्ता शिंदे, विलास केकाण पोलीस नाईक शंकर बांगर, राहुल गायकवाड, विनोद व्होनमाने, सोमनाथ दिवटे, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, रुपेश गैंगजे, तुषार गैंगजे, राहुल मिसाळ, नितीन सपकाळ, म.पो.ना. भाग्यश्री जमदाडे, म.पो.शि. सरस्वती काळे यांनी कामगिरी केली आहे.
Discussion about this post